आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
पत्रकार बांधवांची निवेदनाद्वारे मागणी
वणी : प्रभाकर भोयर मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून, अटक करण्यात आलेल्या पत्रकार बांधवाला न्याय मिळावा, तसेच प्रकरणातील मोकाट असलेल्या अन्य आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत पत्रकार बांधवानतर्फे येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. प्रभाकर भोयर मृत्यू प्रकरणी वणी येथील पत्रकार विवेक तोटेवार यांना दिनांक 10 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांनी कव्हर केलेल्या एका बातमीच्या आधारे ही अटक झाली आहे. एखाद्या बातमीच्या आधारे जर पत्रकारांना अटक होत राहिली तर पत्रकारांना पत्रकारिता करणे कठिण होईल. संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मीडियाला मिळालेल्या स्वातंत्र्यावर हा घाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच या प्रकरणातील अन्य अरिपींना अटक करावी अशी मागणी पत्रकार बांधवांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आज सोमवारी दिनांक 14 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12 वाजता वणी शहरातील विविध पत्रकार संघटना व शहरातील पत्रकार यांनी एकत्र येत उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेतली. दरम्यान उपविभागीय अधिकारी यांनी पत्रकारांची बाजू ऐकून त्यांच्याशी चर्चा केली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी पत्रकारांना दिले. चर्चेनंतर पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे. विवेक यांनी बातमीच्या स्वरुपात त्यांची बाजू मांडली. सोबतच मृतक प्रभाकर भोयर यांचे स्टेटमेंट घेऊन त्यांची देखील बाजू बातमीत मांडली होती. सुमारे 15 दिवसांनी त्यांचा नागपूर येथे मृत्यू झाला. या मृत्याला जबाबदार धरून या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र प्रथम अन्य आरोपीना न पकडता पत्रकार विवेक तोटेवार यांनाच अटक करण्यात आली. विशेष म्हणजे या प्रकरणातील अन्य आरोपींना पकडू नये यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील एका बड्या राजकीय पदाधिकार्यांचा दबाव येत असल्याची माहिती असुन, पञकार मात्र यात भरभटला जात आहे. त्यामुळे बाकी आरोपीना
तात्काळ अटक करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देतांना पत्रकार गजानन कासावार, जब्बार चीनी, राजू तुराणकर, रामकृष्ण वैद्य,राजू गव्हाणे, शेख इकबाल, ज्ञानेश्वर बोनगिरवार, पुरुषोत्तम नवघरे, आकाश दुबे, जितेंद्र कोठारी, संदीप बेसरकर, परशुराम पोटे, राजेंद्र निमसटकर, दिगंबर चांदेकर, मोहम्मद मुष्ताक, मुन्ना बोथरा, श्रीकांत किटकुले,अजय कंडेवार इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...