Home / महाराष्ट्र / महाराष्ट्रत सर्वप्रथम...

महाराष्ट्र

महाराष्ट्रत सर्वप्रथम हिंगणघाट बाजार समितीचा शेतकरी हिताचा आणखी एक क्रांतिकारी निर्णय

 महाराष्ट्रत सर्वप्रथम हिंगणघाट बाजार समितीचा शेतकरी हिताचा आणखी एक क्रांतिकारी निर्णय

वाहन खाली करण्याची मजुरी जिनिगधारकांची जबाबदारी सभापती एड सुधीर कोठारी यांचे स्पष्ट निर्देश

हिंगणघाट: हिंगणघाट बाजार समितीच्या आवारात सीसीआय व कापूस खरेदी महासंघाच्या वतीने खरेदी केलेला कापुस वाहनातून खाली करण्याचे शुल्काचा भुर्दंड यापुढे शेतकऱ्यांना पडणार नसून अदा करण्याची जबाबदारी ही शेतकऱ्यांची नसून ती भरण्याची जबाबदारी ही पूर्णतः जिनिंग धारकांची आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ही रक्कम देऊ नये असे सुस्पष्ट निर्देश हिंगणघाट बाजार समितीचे सभापती एड सुधीरबाबू कोठारी यांनी कापूस उत्पादक शेतकरी व जिनिंग मालकांना एका पत्र-परिषदेतून दिलेले आहेत.अशा प्रकारचा निर्णय घेणारी महाराष्टातील हिंगणघाट बाजार समिती ही प्रथमच संस्था आहे हे विशेष उल्लेखनिय आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या जिनिग संचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देतांना एड सुधीर कोठारी यांनी सांगितले की,हिंगणघाट बाजार समिती अंतर्गत साईकृपा ऍग्रो इंडस्ट्रीज, पद्मावती जिनिंग,जलाराम जिनिंग,श्री बालाजी जिनिंग,माँ भवानी जिनिंग,माँ रेणुका जिनिग,या ठिकाणी सीसीआय मार्फत कापूस खरेदी सुरू आहे.या जिनिगचा सीसीआय मार्फत झालेल्या करार नाम्या नुसार शेतकऱ्याच्या वाहनातील कापूस खाली करण्याची जबाबदारी ही जिनिगधारकांची आहे.त्यामूळे शेतकऱ्यांकडून वाहणातील कापूस खाली करण्याची मजुरी ही न घेता जिनिग धारकांनी अदा करावी.शेतकरी बांधवांनी जागरूक राहून या संदर्भात सीसीआय मार्फत कापूस विकला असल्यास ही मजुरी जीनिगधारकांना भरण्यास सांगावा असे आवाहन एड सुधीरबाबू कोठारी यांनी शेतकरी बांधवाना करून हिंगणघाट बाजार समितीचा केंद्रबिंदू हा केवळ शेतकरी हाच असून तो कोणत्याही स्थितीत नागविल्या जाऊ नये म्हणून बाजार समिती किती जागरूक आहे याचा प्रत्यय त्यांनी दिलेला आहे.
यावेळी आयोजित पत्र परिषदेला उपसभापती हरिष वडतकर, संचालक मधूकरराव डंभारे,मधुसूदन हरणे,शेषकुमार येरलेकर, उत्तमराव भोयर,ओमप्रकाश डालिया, विनोद वानखेडे,अशोक उपासे,राजेश मंगेकर,राजेश कोचर,सुरेश सातोकर, बळीरामजी नासर, बापूराव महाजन,सुरेश वैद्य,पंकज कोचर,संजय तपासे,सौ सुरेखाताई सायंकार, सौ माधुरीताई चंदनखेडे,साईकृपा ऍग्रो इंडस्ट्रीज,पद्मावती जिनिग,जलाराम जिनिग,बालाजी जिनिग,माँ भवानी जिनिग,माँ रेणुका जिनिग व जलाराम कॉटेक्स चे संचालक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...