आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
घटना मूल चंद्रपूर मार्गावर अजयपूर जवळ घडली
चंद्रपूर (प्रतिनिधी): वाढदिवस साजरा करून स्वगांवाकडे चंद्रपूर परत येत असतांना मृत्यर्वने चार मित्रांना कवटाळल्याची दुदैवी घटना मूल चंद्रपूर मार्गावर अजयपूर जवळ घडली. अपघाता मध्यें मृत्यु पावलेले चारही युवक-युवती मूल शहरातील प्रतिष्ठीत कुटूंबातील व गुणवंत विद्यार्थी असल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यांत येत आहे.मूल येथील धान आणि तांदळाचे प्रतिष्ठीत व्यापारी हिरेन गोगरी यांचा मुलगा योग याचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्य इयत्ता दहावी पर्यंत एकत्र शिकलेल्या योगच्या मित्रांनी स्नेहभोजनाचा बेत आखला. ठरल्याप्रमाणे योग हिरेण गोगरी, स्मित राजु पटेल, अमन सलीम शेख आणि दर्शना विष्णु उधवाणी व प्रगती विजय निमगडे हे एकोणवीस वर्षाचे पाचही जण एमएच-34-एम-9297 क्रमांकाच्या गोगरी यांच्या मालकीच्या क्रेटा कारने चंद्रपूर येथे गेले. वाढदिवसा निमित्य स्नेहभोजन आटोपून रात्रो १०.३० वाजताचे दरम्यान स्वगांवाकडे परत येत असतांना मूल चंद्रपूर मार्गावरील अजयपूर गांवाजवळ शेतामधून तणीस भरून अजयपूर कडे जात असलेल्या उभ्या ट्र्ँक्टरच्या ट्राली क्रमांक एमएच ३४ एल ७४५९ ला पाठीमागेहून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की क्रेटा कारचा पुर्ण छतचं बाहेर निघुन चक्काचुर झाला. कारमधील पाच जणांपैकी स्मित राजु पटेल, अमन सलीम शेख, दर्शना विष्णु उधवाणी आणि प्रगती विजय निमगडे यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर कार चालवित असलेले योग गोगरी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, दरम्यान पोलीस दुरक्षेत्र चिचपल्ली येथील पोलीस कर्मचा-यांना माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेवून सर्व मृतक आणि जखमी योग गोगरी यांना चंद्रपूर येथे हलविले. जखमी योग गोगरीवर सध्या डाॅ. मेहरा यांचे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाता मध्ये सापडलेले पाचही जण शहरातील प्रतिष्ठीत कुटूंबातील सदस्य असून ते बालमित्र होते. मृतकांपैकी स्मित पटेल आणि अमन शेख हे कुटूंबात एकुलते एक असल्याने त्यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या कुटूंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतक स्मित पटेल हा मूल येथील राईस मिल चालक राजु पटेल यांचा मूलगा असून अमन शेख तव्वकल रेडीमेड स्टोअर्सचा संचालकाचा चिरंजीव आहे. दर्शना उधवाणी ही येथील व्हेरायटी स्टोअर्सचे संचालक विष्णु यांची मुलगी असून प्रगती ही चिचपल्ली येथील शिक्षक विजय निमगडे यांची मुलगी आहे. मृतक आणि जखमी योग गोगरी या पाचही जणांनी इयत्ता दहावी पर्यंत येथील सेंट अँन्स हायस्कुल येथे शिक्षण घेतले असून पाचही जण अभ्यासात हुशाल होते. त्यामूळे त्यांच्या अपघाती निधनाने मूल शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...